नळदुर्ग (प्रतिनिधी)- आगामी काळात येणारे हिंदु मुस्लीम सण उत्साहात आणि शांततेत साजरे करुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळंखे यांनी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या शांतात कमेटीच्या बैठकीत बोलताना केले.
दि. 23 मार्च 2025 रोजी येथील पोलिस ठाण्यात हिंदु मुस्लीम समाजाच्या सणांच्या पार्श्वभुमीवर शांतता कमेटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला हिंदु व मुस्लीम समाजातील मान्यवर उपस्थीत होते. आगामी काळात गुढी पाडवा, रमजान ईद, आणि श्री राम जन्मोत्सव हे सण साजरे होणार आहेत. दरम्यान हे सण उत्साहात आणि शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलिस ठाण्याच्या वतीने शांतात कमेटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी, मुश्ताक कुरेशी, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, विनायक अहंकारी, शरीफ शेख, शफीभाई शेख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शहर शिवसेना प्रमुख संतोष पूदाले, माजी उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकुर, हाफेज नियामततुल्ला इनामदार, आलेम महंमद रजा, हाफेज फारुक अहेमद शेख, हाफेज मुजफफर शेख, अलहाज सलीम शेख, सय्यद शहा महंमद इनामदार, राष्ट्रवारी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट शहर अध्यक्ष अजित जुनौदी, शिवसेनेचे मनोज मिश्रा, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड, शाहेदाबी सय्यद, पोलिस उपनिरिक्षक अनंत कांगुणे, जीवीशाचे अमर जाधव यांच्यासह हिंदु मुस्लीम बांधव उपस्थीत होते. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली. त्यानंतर आगामी होणाऱ्या गुढी पाडवा, रमजान ईद आणि श्री राम जन्मोत्सव हे सण शांततेत व उत्साही वातावरणामध्ये साजरे करण्याचे आश्वासन बैठकीत दोन्ही समाजाच्या मान्यवरांनी दिले. त्याच बरोबर शहरात कर्णकर्कश आवाज करीत वाहने चालविणाऱ्यावर कडक कारवाई करावी त्याच बरोबर बस स्थानक परिसरत खुले आम सुरु असलेले मटक्याची दुकाने उघडणाऱ्या मटका एजंटावर कारवाई करावी. अशी मागणी ही या वेळी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या बैठकीत कमलाकर चव्हाण, संतोष पूदाले, ज्ञानेश्वर घोडके, शरीफ शेख, शफी शेख, शहेबाज काझी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर यावेळी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळंखे यांनी शांतता कमेटीत झालेल्या विषयाच्या चर्चेवर दखल घेवून कारवाई करण्यात येईल असे सांगितले. यावेळी भविष्यात होणारे सर्व सण उत्सव डॉल्बी मुक्त करण्याचे आवाहन संतोष पूदाले यांनी केले तर ज्ञानेश्वर घोडके व कमलाकर चव्हाण यांनी नळदुर्ग शहर पोलिस ठाणा हददीत सुरु असलेले मटका जुगार, जळकोट येथे सुरु असलेले ऑनलाइन चक्री जुगार पोलिसांनी तात्काळ बंद करावेत असे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी या दोघांनी दिला आहे.