तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील काक्रंबा येथे गोमांस कारणावरुन दोन गटात तणाव निर्माण झाल्याने गावात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मागासवर्गीय व मुस्लिम समाजाच्या वतीने शिवीगाळ केलेल्या आरोपींना अटक करा. व त्यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यासाठी तुळजापूर पोलीस ठाण्यावर शनिवार दि. 22 मार्च रोजी धाव घेवुन पोलिस निरक्षक यांना निवेदन देण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे झोपडपट्टी भागात गोमांस विक्री होत असल्याच्या संशयावरून मांस विक्री करणाऱ्या वाहनासह दुकानाची तोडफोड काही आज्ञातांनी केली होती. या घटनेची तुळजापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञाता विरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान याच घटनेवरून काक्रंबा येथील काही तरुणांनी भीम नगर येथे जात महिलांना शिवीगाळ करत तुमच्यामुळेच गावात गोमांस विक्रीसाठी येत आहे असे म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली. याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी संध्याकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान दिगंबर मस्के हे गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी बस स्टैंड वर भीम नगर येथील मोठा जमाव जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी बाळासाहेब मस्के व अरविंद चंदनशिवे यांच्या सह ज्येष्ठ नागरिकांनी समाजातील लोकांना समजावून घरी पाठवले. मात्र विनाकारण शिवी गाळ करणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काक्रंबा येथील आज मागासवर्गीय व मुस्लिम समाजाच्या वतीने काक्रंबा ते तुळजापूर पायी मोर्चा काढला. यावेळी मारुती चंदनशिवे, करीम अन्सारी, बाळासाहेब मस्के, विनोद साबळे, अरविंद चंदनशिवे, सुधीर मस्के, शुभांगी साबळे, हुसेन शेख, सद्दाम अन्सारी, नशीब शेख, आयुब अन्सारी, मिनाबाई साबळे, ज्योती साबळे, शितल मस्के आदींच्या सह्या आहेत.