कळंब (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेजच्या यांच्या वतीने 8 मार्च 2025 रोजी महिला अधिकारी व वाहक यांच्या विशेष सन्मानासह - सन्मानचिन्ह, मानपत्र, देऊन सत्कार करण्यात आला, अण्णासाहेब पाटील - सोशलवर्क कॉलेज संस्थापक अध्यक्ष - प्रा . डॉ . महेश राजेनिंबाळकर यांच्या - मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ वसुधा दापके देशमुख (स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ ) प्रमुख पाहुणे - म्हणून उमेश जगदाळे (केंद्र प्रमुख - कामगार कल्याण मंडळ कळंब,) व आनंत कवडे (वाहतूक निरिक्षक धाराशिव आगार,) ॲड आरती - राजेनिंबाळकर, सारीका सावंत, व कुलदीप सावंत सचिव डॉ.आर. एम. काझी प्राचार्य उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या यांच्या हस्ते समाजसेविका व महिलांच्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, या प्रमुख मान्यवराच्या हस्ते कुमुदिनी सोनवणे (भांडार अधिकारी कार्यशाळा धाराशिव) तारामती म्हैत्रे (वाह-तूक प्रवेशिका अधिकारी), प्रणिता घोडके, ( धाराशिव आगार), ज्योत्स्ना सोनवणे, (सहाय्यक कारागीर ) विद्युत विभाग विभागीय कार्यशाळा माधुरी मोकाशे (वाहक धाराशिव आगार), वैशाली पवार (वाहक धाराशिव आगार), शोभा धंगेकर, ( वाहक धाराशिव आगार) यांचा सत्कार संपन्न करण्यात आला, कार्यक्रमासाठी प्रा बापू बाराते, प्रवीण साळुंके राहुल शिरसाट, पवन नाईकल, अभी घुटे, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता शिंदे व आभार प्रदर्शन मोनिका गौरकर यांनी मानले.