धाराशिव: (प्रतिनिधी)- दरवर्षी प्रमाणे यंदा ही धारासूर मर्दिनी महिला स्वयंसेवी संस्थेचा महिलादिना निमित्त स्वयंवर कार्यालयात “सप्तरंग 2025“ हा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रथम संस्थापक अध्यक्ष डॉ. अनार साळुंके,आजी माजी अध्यक्ष, मानद सदस्य, विद्यमान कार्यकारिणी, यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सुरुवात झाली .फेडरेशनच्या माजी अध्यक्ष कै. मंजुषा कोकिळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियां कडून दरवर्षी 25000 रु. निधी देण्यात येतो तो त्यांचे पती श्री बाळासाहेब कोकिळ यांच्या हस्ते आष्टा कासार येथील शुभांगी सगर या गरजु विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. या उपक्रमाचे नियोजन तेजस्वीनी मंडळाने केले. त्यानंतर फेडरेशन अध्यक्षा डॉ. रेखा ढगे यांनी प्रास्ताविक केले.इतनी शक्ती हमें देना दाता या प्रार्थनेवर विद्यमान अध्यक्ष, कार्यकारणी, सर्व मंडळाच्या अध्यक्षा यांचे सादरीकरण झाले. किरण गवळी व अश्विनी चौधरी यांनी गण सादर केला.अक्षरवेल, राष्ट्र सेविका समिती, स्वयंवर योगा मंडळ, कालिका देवी मंडळ, सावित्री बाई फुले मंडळ, माता रमाई कॉलेज, नॉटी 40 ग्रुप ,सुहासिनी ग्रुप,श्रीयानी ग्रुप,पल्लवी गांधी ग्रुप, मराठा सम्राज्ञी मंडळ, अहिल्या देवी सखी मंडळ, सावित्री सखी ग्रुप, आनंदीबाई जोशी मंडळ, शताक्षी मंडळ, जैन महिला मंडळ, उदयोगिनी मंडळ, राजस्थानी बहू मंडळ, कालिका प्रतिष्ठान, त्रिमूर्ती मंडळ, ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, वीरशैव मंडळ, राजस्थानी मंडळ अशा 24 मंडळानी यात अतिशय उत्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.
अनेक प्रायोजकांनी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ साठी बक्षीसे ठेवली होती ! वैशिष्ट्यपूर्ण अशा या लकी ड्रॉ चे नियोजन फेडरेशच्या उपाध्यक्ष नीता कठारे, सचिव उज्वला मसलेकर, कोषाध्यक्ष माधवी भोसरेकर, माजी अध्यक्ष संगीता काळे, सांस्कृतिक अध्यक्ष अनुराधा तोडकरी, उदयोगिनी अध्यक्ष दमयंती साळवी यांनी केले .
विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते त्याचे नियोजन सहप्रसिद्धी प्रमुख उज्वला कुलकर्णी यांनी केले. तिकीट छपाईसाठी वर्षा हंबीरे यांनी योगदान दिले.विविध मंडळासाठी ही लकी ड्रॉ म्हणून 501 रु ची 5 बक्षीसे नीता कठारे, डॉ रेखा ढगे, डॉ अनार साळूंखे, समता ब्यु टी शॉपी च्या स्वाती काटे, उज्वला कुलकर्णी यांनी ठेवली होती.
कार्यक्रमात देवींची गाणी, स्त्री शक्तीवर प्रकाश पडणारी, इतिहास सांगणारी, माय मराठीचा अभिमान सांगणारी आणि याच बरोबर निखळ मनोरंजनासाठी रिमिक्स गाणी, हलकी फुलकी गाणी यावरही डान्स सादर करण्यात आलेफ सर्व मंडळानी घेतलेली मेहनत त्यांनी केलेल्या सादरीकरणातून दिसून येत होती.
लकी ड्रॉ ची 501 रु चे मानकरी आनंदी बाई जोशी ब्राम्हण महिला मंडळ, कालिका प्रतिष्ठाण मंडळ, सावित्री सखी ग्रुप ,शताक्षी मंडळ, नॉटी 40 ग्रुप ही मंडळे ठरली... या कार्यक्रमासाठी डॉ रेखा ढगे आणि नीता कठारे यांनी विशेष परिश्रम घेतले. फेडरेशनच्या कार्यकारिणीने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन सुनीता गुंजाळ-कवडे व जयमाला चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पुनम तापडिया यांनी केले. एकंदरीत सप्तरंग 2025 कार्यक्रम अतिशय जोशपूर्ण, उत्साहात आणि जल्लोष पूर्ण वातावारणात साजरा झाला. या 20 वर्षाच्या सातत्यपूर्ण उपक्रमाबद्दल उद्योजिका व ओस्लाच्या संचालक किरण देशमाने यांनी फेडरेशन अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.