कळंब (प्रतिनिधी)- कळंब बस आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचारीचे वाहतुक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने मंगळवार दि. 4 मार्च रोजी विनयभंग केल्याची तक्रार कळंब पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. या घटनेमुळे कळंब परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब बस आगारामध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचारीचे वाहतूक नियंत्रण म्हणून कार्यरत असलेले कल्याण आत्माराम कुंभार रा.मस्सा(ख) ता.कळंब जि. धाराशिव याने महिला वाहक ही मंगळवारी संध्याकाळी 8:30 वाजता एकटी घर जात असताना बाजार मैदानात अंधाराचा फायदा घेऊन कल्याण कुंभार हा दारुच्या नशेत येऊन महिलेचा हात धरून माझ्या सोबत लॉजमध्ये चल असे म्हणत महिलेच्या अंगाला हात लावून विनयभंग केल्याची तक्रार कळंब पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री संबंधित महिलेने दिली. यावरून कळंब पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.

 
Top