तुळजापूर (प्रतिनिधी)- शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक तुळजाभवानी मातेची पूजा व आरती केली. मंदिर संस्थान मध्ये चालू असलेल्या विकासकामांच्या पाहणीबरोबरच येथील संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करून मार्गदर्शक सूचना दिल्या.
प्रत्यक्ष दर्शनरांगेमध्ये जाऊन दर्शन व्यवस्थेची पाहणी केली. मंदिर संस्थानमध्ये चालविले जाणारे विविध उपक्रम जाणून घेतले. संपूर्ण परिसराच्या आणि व्यवस्थेच्या पाहणीनंतर त्यांनी मंदिर संस्थानच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थेतील उपाययोजनांबद्दल आणि भविष्यकालीन योजनांबाबत मार्गदर्शन केले.
मंदिर संस्थान तर्फे त्यांचा देवीजींची प्रतिमा, महावस्त्रे, श्रीतुळजाभवानी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे, सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, सहाय्यक व्यवस्थापक (विदयुत) अनिल चव्हाण, सॉफ्टवेअर अभियंता सुधीर कदम, नेटवर्क अभियंता शुभम वायकोस, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सुजित जमदाडे तसेच मंदिर संस्थांचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.