तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठी सिनेअभिनेत्री व लावणी सम्राज्ञी सुरेखा कुडची यांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. सुरेखा कुडची यांनी खुर्ची सम्राट, अरे देवा, तीन बायका फजिती ऐका, फॉरेनची पाटलीन या सारख्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी मराठी बिग बॉस सिझन 3 मध्ये स्पर्धक म्हणूनही भाग घेतला होता. सुरेखा कुडची या लावणी सम्राज्ञी म्हणून देखील महाराष्ट्राला परिचित आहेत. सुरेखा कुडची यांच्या सोबत अभिनेत्री संध्या पाटील यांनी देखील श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. संध्या पाटील यांची 'जुळली गाठ गं..' हि मालिका सन मराठी या वाहिनीवर सुरू आहे.

श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनानंतर संध्या पाटील व सुरेखा कुडची यांनी आत्मिक समाधान मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. सध्या मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामासंदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले.

 
Top