कळंब (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमनगर येथे दि. 11 मार्च रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये या जयंतीच्या अध्यक्षपदी शीतल हौसलमल, उपाध्यक्ष धीरज गायकवाड, कोषाध्यक्ष प्रवीण गायकवाड, सचिव निलेश गांजीकर, सहसचिव अमित गांजीकर यांची बिनविरोध कमिटीच्या पदी निवड करण्यात आली .
या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार दयानंद गायकवाड नंदू हौसलमल, कुंदन गायकवाड, प्रकाश खंडागळे, कैलास गायकवाड, दिलीप कसबे,मोहन गायकवाड, सुनील गायकवाड, दादासाहेब गायकवाड, मुकेश गायकवाड, राजाभाऊ गायकवाड, मारुती गायकवाड, पवन बचुटे आदी उपस्थित होते. तर या कमिटीमध्ये सदस्य म्हणून अमित गायकवाड, अक्षय ओव्हाळ,दर्शन गायकवाड आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.