धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदू नवसंवत्सर नवीन वर्ष गुढीपाडवा निमित्त धाराशिव शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने नववर्ष स्वागत शोभायात्रा दुचाकी रॅली बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.
धाराशिव शहरातील सेंट्रल बिल्डिंग समोरील महात्मा बसवेश्वर चौकापासून ही बाईक रॅली निघणार असून सकाळी दहा वाजता या बाईक रॅलीची सुरुवात होणार आहे. ही बाईक रॅली धाराशिव शहरातील सकल हिंदू समाज महिला पुरुष युवक युवतींच्या सहभागातून महात्मा बसवेश्वर चौकापासून सुरू होऊन राजमाता जिजाऊ चौक, संत गाडगेबाबा चौक, शहर पोलीस स्टेशन मार्गे काळा मारुती चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीचा समारोप होणार असून या रॅलीत धाराशिव शहरातील हिंदू महिला पुरुष युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि हिंदूंच्या या शक्ती प्रदर्शनात आपण आपले योगदान द्यावे. असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.