धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची धाराशिव जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष  सुखदेव भालेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष दीपक जाधव व धाराशिव राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश दत्ता बंडगर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे जिल्हाध्यक्ष महादेव खटावकर उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीत धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनील मल्लिकार्जुन नकाते व इम्तियाज अहमद बागवान, जिल्हा संघटक पोपट पुरी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोंदर व लिंबराज कुंडलिक कुंभार, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन गुरव, धाराशिव तालुकाध्यक्ष अजित भोसले, तालुका कार्याध्यक्ष सचिन जगदाळे, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर कोळेकर,  उमरगा तालुकाध्यक्ष गिरीजानंद बिराजदार, तुळजापूर तालुकाध्यक्ष भीमाशंकर राठोड, तालुका कार्याध्यक्ष  हरिभाऊ मंडवळे, तालुका उपाध्यक्ष व्यंकट पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष प्रेम लांडगे, परंडा तालुकाध्यक्ष  राम इटकर, धाराशिव शहराध्यक्ष गौस तांबोळी, धाराशिव शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास शेरकर, धाराशिव शहर उपाध्यक्ष नितीन कुंभार यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन सुधीर अलकुंटे यांनी केले.  कार्यक्रमासाठी प्रदीप वाघमोडे, अजय विंचुरे , बालाजी कांबळे, मंगेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

 
Top