तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरालगत धाराशिव छत्रपती संभाजी नगर (हायवे लगत असणारे सर्वे नंबर 138, 139) या ठिकाणी संपादित जमीनीमधील ले-आऊट रद्द करणे व भावींकासाठी यात्रा मैदान  करण्याचा मागणी साठी शहरातील महिलांनी सोमवार दि ९रोजी तहसिल कार्यालया समोर उपोषण सुरु केले होते. अखेर प्रशाषणाने या बाबतीत लेखी पञ नायब तहसिलदार पेरे अमर गांधले बालाजी चामे यांनी  देवुन  लिंबु शरबत महिलांना देवुन  उपोषण सोडवले. 

यावेळी महसुल प्रशाषणाने दिलेल्या पञात म्हटले आहेकी तुळजापूर शहरालगत धाराशिव छत्रपती संभाजी नगर (हायवे लगत असणारे सर्वे नंबर 138, 139) या ठिकाणी संपादित जमीनीमधील ले-आऊट रद्द करणे व भावीकासाठी यात्रा मैदान होणे बाबत

अन्यथा दिनांक 03.03.2025 रोजी पासुन अमरण उपोषण करणार असले बाबत अर्ज सादर केलेला आहे. प्रकरणात मा. उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांनी तहसिलदार तुळजापूर यांचे अध्यक्षतेखाली समीती गठीत केलेली असून समीती स्तरावर प्रकरणात सुनावणी चालु असुन सुनावणीची पुढील तारीख दिनांक 20.03.2025 रोजी ठेवण्यात आलेली आहे. सुनावणीअंती प्रकरणात मा. उपविभागीय अधिकारी धाराशिव यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याने आपण दिनांक 03.03.2025 रोजी पासून करण्यात येणारे अमरण उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहाकार्य करावे ही विनंती.केली होती 

या उपोषणास्थळी का़ँग्रेस जिल्हाअध्यक्ष धिरज पाटील  माजी नगराध्यक्ष सचिन,रोचकरी सह विविध सामाजिक संघटना पक्ष पदाधिकारी यांनी  भेटी दिल्या होत्या. 

 
Top