धाराशिव (प्रतिनिधी)- रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे वाणिज्य विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ग्राहक संरक्षण कायदा 2019 मुख्य उद्देश  ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, अनुचित व्यापार पद्धती आणि उत्पादन सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे असे प्रतिपादन ॲड.  मधुमती सस्ते यांनी केले. 

2019 च्या नवीन कायदा मुळे यापूर्वीचा 1986 चा कायदा रद्द झाला. प्रशासनात सुधारणा, ई- कॉमर्ससाठी तरतूद व कठोर दंड अशा नवीन तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्राहकांना आपल्या न्याय हक्कांसाठी असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले. यानंतर मा. ॲड. मुकुंद सस्ते (माजी न्यायाधीश जिल्हा ग्राहक तक्रार  मंच,धाराशिव) ग्राहक संरक्षण कायदा नुसार मिळालेले अधिकार आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच आपल्या एकूण कारकिर्दीत न्यायदान करताना आलेल्या अनेक प्रदीर्घ अनुभव प्रसंगी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मा. प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. छाया दापके होत्या. वाणिज्य विभाग प्रमुख बालाजी नगरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुप्रिया शेटे व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अवधूत नवले यांनी केले. व्याख्यानासाठी महाविद्यालयातील डॉ.अमर निंबाळकर, प्रा.डॉ. दत्ता साखरे, प्रा. माधव उगिले, प्रा. राजा जगताप तसेच इतर प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top