धाराशिव (प्रतिनिधी)- शहर हद्दीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे गुंड  प्रवृत्तीच्या लोकांकडून महाविद्यालयातील व रुग्णालय कर्मचारी यांना त्रास होत असल्याने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव  यांनी दि.17.03.2025 रोजी भेट देवून सदर ठिकाणी कार्यन्वीत करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये 1 उपनिरीक्षक, पोलीस ठाणे धाराशिव शहरचे 02 अंमलदार, पोलीस ठाणे आनंदनगरचे 2 अंमलदार, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण 02 अंमलदार हजर ठेवणे बाबत आदेशीत केले. तसेच प्रवेशासाठी एकच गेट चालु ठेवणे, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नोंदी ठेवणे व इतर आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या. यावेळी मा. उपविभागीय  पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड, पोलीस ठाणे धाराशिवचे पोलीस निरीक्षक श्री. शकील शेख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचे अधिष्ठाता हे उपस्थितीत होते.        


 
Top