तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री कालेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह उत्साहाने संपन्न झाला.

अखंड हरिनाम सप्ताहात हभप खोत महाराज (धाराशिव ),हभप गंगाधर महाराज घाडगे,हभप रमाकांत महाराज भोसले,हभप तानाजी महाराज भोईटे , हभप कान्होबा महाराज देहूकर यांची किर्तने झाली.तर काल्याचे किर्तन हभप प्रसाद महाराज माटे यांचे संपन्न झाले.महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.


 
Top