धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव येथील मुलींच्या वस्तीगृहामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व विद्यापीठ  उप-परिसर कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनीन्नसाठी मार्गदर्शन  व कवयित्री संमेलन असा उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ उप-परिसराचे संचालक डॉ. प्रशांत दीक्षित  हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धारासुर मर्दिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. रेखा ढगे, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाराशिव केंद्र उपळे बीट येडशी येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती सोनाली गुडे, तसेच अक्षरवेलच्या सदस्या डॉ. सोनाली दीक्षित या उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनीषा असोरे  यांनी केले. डॉ. रेखा ढगे यांनी आपली इच्छा व जिद्द असेल तर आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो पण त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असावी असे मार्गदर्शन केले.  श्रीमती सोनाली गुडे  यांनी विभक्त कुटुंब पद्धतीचे आकर्षण असलेल्या परंतु विभक्त झाल्यानंतर स्वतःचेच हाल करून घेणाऱ्या स्त्रियांवर "उन उन खिचडी" ही कविता सादर केली.  त्याचबरोबर मुलींनी निर्भय बनवून आपल्या क्षमता व कलागुणांचा विकास करावा. परंतु सावधानता बाळगण्यासोबतच कुटुंबाची काळजी घ्यावी असे वास्तवदायी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सोनाली दीक्षित यांनी "तो  मायक्रोबायोलॉजी तर ती लिटरेचर, तो सिरीयस तर ती स्माईली", दोन भिन्न व्यक्तिमत्व असले तरी ते एकमेकांना पूरक असतात हे "तो आणि ती" या कवितेद्वारे सांगितले. विद्यापीठ उप-परिसराचे संचालक डॉ. प्रशांत दीक्षित यांनी सदरील जागतिक महिला दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपला उपस्थितांना मार्गदर्शन केले. आयेशा मुल्ला या विद्यार्थीनीने जीवनात एक तरी मैत्रीण असावी ही कविता सादर केली तर सानिका या विद्यार्थीनीनेही कविता सादर केली. डॉ. शालू मोले यांनी महिलांच्या जीवन कार्यावर स्त्रीचे महत्त्व अधोरेखित करणारी  कविता सादर केली तर डॉ. महेश्वर कळवावे यांनी कृतज्ञता ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना झाकडे यांनी तर आभार डॉ. शालू  मोले यांनी मांडले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.  राहुल खोब्रागडे, डॉ. मेघश्याम पाटील व डॉ. जितेंद्र शिंदे उपस्थित होते. तसेच, डॉ. जितेंद्र कुलकर्णी, डॉ.  पूजा खोब्रागडे, रश्मी पाटील, डॉ. आर.पी. बारकुल, योगेश्वरी कळलावे, मेघा काळे, कविता चव्हाण, पौर्णिमा गुंड यासोबतच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

 
Top