तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटी याच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली.
सिम्बॉयसिस पुणेचे चेतन ताडे व रूपम पोळ यांनी विद्यार्थ्यांना सिंबोसिच्या वतीने उपलब्ध असणाऱ्या सर्व कोर्सेसचे माहिती दिली. तसेच संगणक विभागामधील विद्यार्थ्यांना 300 तासाचे प्रोग्रामिंग मोफत प्रशिक्षण सीएसआर फंडांतर्गत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी संगणक विभाग प्रमुख प्रा. डी. जे. वाघमारे, प्रा. शेख, प्रा. रणखांब, प्रा. कदम नयन, प्रा. घोरपडे हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकित जाधव या विद्यार्थ्यांने केले.