तुळजापूर (प्रतिनिधी) - उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, महसुल अधिकारी यांनी घेतली शहरातील वाहतुक,अतिक्रमण तसेच मंदीर परीसरातील व्यापारी, फेरीवाले, गाडेवाले, रिक्षावाले तसेच शहरवासी यांची घेतली बैठक संपन्न झाली.
सदरील बैठकी मध्ये शहरातील सामाजीक काम करणारे नेते, सर्व व्यापारी, महीला, रिक्षावाले यांनी आपली मते प्रशासनापुढे मांडली. शहरातील होणारी वाहतुक कोंडी बाबत तसेच शहरातील भवानी रोडकडे जाणारी वाहने, छोटे व्यापारी, हातगाडे, बांगड्या विकणाऱ्या महीला बाबत तसेच वाहन पार्कींग बाबत सविस्तर लेखी स्वरुपामध्ये माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिले. वरील सर्व गोष्टीचा योग्य विचार करुन प्रशासन योग्य ती कार्यवाई करेल बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांनी शब्द दिला.