तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील मौजे बारुळ येथील श्री बाळेश्वर प्रतिष्ठान आयोजित महाशिवरात्री निमित्ती होत असलेल्या बारुळ महोत्सवास मोठ्या जल्लोषात आणि थाटात सुरुवात झाली. राज्यभरातून या महोत्सवास कलाकारांनी हजेरी लावली असून याचे उद्घाटन धाराशिव मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांचा हस्ते झाले. तर स्टेज पूजन उमाकांत मिटकरी यांनी केले.

यावेळी बाबुराव यावलकर, माजी सरपंच जयप्रकाश पाटील, माजी उपसरपंच राजकुमार वट्टे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, धनंजय पाडुळे उपसरपंच भास्कर सगट, शिवाजी खंडागळे नबीलाल शेख,तालुका कृषी अधिकारी एम.एन.देवकाते,सुरेश ठोंबरे, राजकुमार ठोंबरे, कलीम शेख, तानाजी क्षीरसागर , दत्ता सगट, शेट्टीबाबा नारायणकर, सुधाकर कांबळे, गौतम रणदिवे, सोमनाथ शेटे, भास्कर वट्टे, दयानंद कुंभार, संजय ठोंबरे, ग्रामसेवक प्रशांत भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. 

पहिल्या दिवशी झालेल्या फेरीत खुला लावणी गटातून ऋतुजा सदाफुले, सानिका भागवत, सृष्टी जाधव, काव्य जठार, अनामिक अहिरे, श्वेता अवसरमोल, आस्था डांगे तर प्रौढ खुला गटातून अनिल घोडके, प्रकाश साळुंके, पायल पाटील, घनशाम सोनवणे, गणेश पवार, सानिका भागवत, राजू टिपरी आणि युगल गटातून गणेश अभि, नवनाथ अनुजा, अनामिक अंकिता, सुमित आरती, श्वेता सुप्रिया, गणेश इब्राहिम, कृष्ण राजेश यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. या स्पर्धेसाठी नाशिक, रायगड, मुंबई, सातारा, सांगली, बीड आदी भागातून कलाकारांनी हजेरी लावून रसिकांचे मन जिंकले. यासाठी ज्ञानदेव फावडे, राजकुमार सुपनार, शिवराज ठोंबरे, विशाल पाटील, महेश ठोंबरे, कमलाकर ठिंबरे, सुशीलकुमार ठोंबरे, दानप्पा वट्टे, सुभाष घाटे, शिवाजी नवगिरे, तुषार मंडळकर, उमाकांत वट्टे, महादेव कुंभार, भगवान नाझरेकर, रतन मुदगुडे, संतोष कडबाने, परिश्रम घेतात. कार्यक्रमांचे प्रास्ताविक सुधीर सुपनार यांनी केले. तर आभार राम कस्तुरे यांनी मानले. तर सूत्रसंचलन श्रीराम पोतदार यांनी केले.

 
Top