भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही. शिंदे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळ पाथरूडचे सहसचिव व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. शिंदे उपस्थित होते.
समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. टी आर. बोराडे, आयक्यूएसी समन्वयिका डॉ. ए. एस. जगदाळे व प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. डी. पडवळ यांनी देखील या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दर्शविली. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आर.डी राठोड यांनी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या कार्यावरती प्रकाश पाडला टाकला. त्याचबरोबर डॉ. एन. डी. पडवळ यांनी विज्ञानाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगितले. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांनी विज्ञानाची जागतिक प्रगती मध्ये असलेली भूमिका सांगत प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत समाजोपयोगी संशोधन करत रहावे असे आव्हान केले. तसेच अध्यक्ष प्राचार्य. डॉ.डी.व्ही शिंदे यांनी ही डॉ. सी.व्ही.रमन यांच्या कार्याचा आजच्या तरुण पिढीने आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे प्रतिपादन केले.
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यातील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व गणित विभागातील प्राध्यापक आर.डी राठोड, डॉ. एस. एम.माळी, एन एन भोंग, ए. एम. कुटे, जे.डी मसराम, ए. एल. डोंगरदिवे यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली. तर वनस्पतीशास्त्र व पाणीशास्त्र विभागातील डॉ. एन.डी पडवळ, जी.एस खंदारे, डी.जी गिरी, आर एस गायकवाड, एम एस खराटे, एस एम अलगुंडे यांनी भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस प्रधान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.एम अलगुंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन हे प्रा. ए. एल. डोंगरदिवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.