भूम (प्रतिनिधी)- खर्डा -जामखेड रोडवर उळूप फाट्यावर जवळील सोनारी दुध डेअरी समोर दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यु झाला. तिघे जखमी झाल्याची घटना दि. 28 फेब्रुवारी रोजी चारच्या दरम्यान घडली आहे. अपघातानंतर तब्बल दीड तास गावकऱ्यांनी रस्त्यामध्ये दगडे मांडून रास्ता रोको केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूमकडुन गावी बऱ्हाणपूरकडे जाताना मागुन सुसाट वेगाने आलेल्या दुचाकीने पुढे चालत असलेल्या दुचाकी स्वराला  जोरदार धडक दिल्याने गणेश गौतम वारे (वय 40) बऱ्हाणपूर ता. भूम या युवकाचा जागीच मृत्यु झाला. तर सौरभ शेषेराव वारे (वय 22) रा. बऱ्हाणपूर ता. भूम हे (एम. एच. 25 ऐ. बी. 6554) या शिवाय मागून येत असलेल्या जोरदार दुचाकीच्या धडकेत हा अपघात झाला आहे. या दुचाकीवरील दोघे कल्याण सुभाष काळे (वय 18) रा.गोरमाळा फाटा व रामा अशोक काळे (वय 17) रा. ईडा. अंतरगाव हे (एम.एच. 45 के - 0376) जखमी असून त्यांच्यावर भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.


 
Top