धाराशिव (प्रतिनिधी)- मस्साजोग प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, तीन महिन्यानंतरही कृष्णा आंधळे आरोपी सापडत नाहीत त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. परळी येथील गुंड टोळीला पाठीशी घालणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्या या प्रमुख मागणीसाठी धाराशिव, तुळजापूर, कळंब येथे दि. 6 मार्च रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
धाराशिव शहरात मराठा आंदोलकासहीत इतर काही संघटनांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. हातात सरपंच संतोष देशमुख यांचा फोटा होता. शहरातील व्यापाऱ्यांनी या बंदला उत्तमपणे प्रतिसाद दिला. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारीच दिले होते.
तुळजापूरमध्ये प्रतिसाद
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात प्रथमच कडकडीत बंद पाळला गेला. भाविकांची गैरसोय होवु नये म्हणून मंदीर परिसरातील दुकाने, हाँटेल मराठा बांधवांनी उघडे ठेवण्यास सांगितले होते. दहा नंतर या भागातील व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवुन बंदला जाहीर पाठींबा दिला. यावेळी सकल मराठा समाजा तर्फ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिलदार मार्फत निवेदन देवुन मस्साजोगचे संरपच के संतोष देशमुख यांची क्रुर हत्या करणाऱ्या कृष्णा आंधळे अटक करुन आरोपींची
पाठराखण करणाऱ्या आका धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा ही राजीनामा घेऊन त्याला सहआरोपी करूण मुख्य आरोपींना फाशी शिक्षा करा. हे प्रकरण जलद गति न्यायालयात दाखल करून महाराष्ट्रातील गुंड प्रवृतीच्या राजकारण्याणा व त्याच्या बगल बच्यांवर अंकुश घालण्याकरीता नराधमाना फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलावीत.असे निवेदनात म्हटले. या निवेदनावर शेकडो सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.