तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नवीन बसस्थानक येथे एका पन्नास वर्षिय महिलेस चोऱ्या होत आहेत. दागिने घालुन फिरु नका असे म्हणत दागिने काढण्यास सांगुन ते लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली. या घटनेने बसस्थानक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आह.े

या बाबतीत अधिक माहीती अशी की, लता तुकाराम कोळेकर, वय 50वर्षे, रा. मोर्डा ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि.28 फेब्रुवारी रोजी नविन बसस्थानक तुळजापूर येथे असताना अनोळखी दोन इसमांनी मावशी तुळजापूर मध्ये चोऱ्या होत आहेत. दागिने घालून फिरु नका म्हणुन फिर्यादीस विश्वासात घेवून दागिने काढण्यास सांगितले. त्यावेळी लता कोळेकर यांनी त्यांचे गळ्यातील सोन्याचे दागिने 6 ग्रॅ वजनाचे पिशवीत ठेवल्याचे भासवुन महिलेचे दागिने घेवून पसार झाले. अशी फिर्यादी लता कोळेकर यांनी दि.1 मार्च 2025 रोजी दिल्यावरुन तुळजापूर पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top