धाराशिव (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर व परंडा येथील एमडी ड्रग्ज अमली पदार्थ प्रकरणाचा तपास केंद्रीय नारकोटेक्स ब्युरो मार्फत करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बुधवार दि. 19 मार्च रोजी संसदेत केली आहे.

यावेळी बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले की, तुळजापूरात गेल्या तीन वर्षापासून ड्रग्जची विक्री चालु आहे. हे कुणाचा आशिर्वादाने चालु होते. यात पोलिसांचा सहभाग होता का? असा प्रश्न उपस्थित केला. ड्रग्ज विक्री प्रकरण तेव्हाच गांभीर्याने घेणे गरजेचे असताना त्यावेळेस या प्रकरणाचा तपास हेडकाँन्स्टेबल नंतर पीएसआय नंतर ऐपीआयकडुन केला गेला. विशेष म्हणजे जी महिला ही रॅकेट चलवित होती त्या महिलेस पोलिसांनी पकडले आहे. तिच्याकडून 5 कोटी रूपये काही सोने हस्तगत केले आहे. त्यामुळे ही महिला कोणाच्या आशिर्वादाने हे रॅकेट चलवित होते याचा गंभीरपणे तपास होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे 14 फेब्रुवारी व 4 मार्च रोजी तुळजापूरमध्ये एमडी ड्रग्ज सापडले आहेत. 

या प्रकरणी  गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंञी देवेंद्र फडणवीस यांना तपास करण्याबाबतीत पञ लिहुन विनंती केली आहे. असे सांगुन  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी नारकोटेक्स ब्युरो मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी संसदेत केली आहे.

 
Top