कळंब (प्रतिनिधी)- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समितीद्वारे दरवर्षी विचार संवर्धन महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी या महोत्सवाच्या अंतर्गत पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित केले आहे.
यासंदर्भात रविवार, दि. 02 मार्च, 2025 रोजी प्रा. डॉ. संजय कांबळे यांच्या कल्पना नगर येथील निवासस्थानी भास्करराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने विचार संवर्धन महोत्सवाच्या अंतर्गत कळंब शहरात पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन घ्यावे, असा ठराव मांडला. त्यास सर्व उपस्थितांनी एकमुखाने संमती दिली.
हे साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून हे संमेलन दि.11 आणि 12 एप्रिल 2025 रोजी घेण्याचे निश्चित केले. यामध्ये प्रामुख्याने ग्रंथदिंडी, तीन परिसंवाद, कविसंमेलन, पोवाडा, किर्तन इत्यादी कार्यक्रमांचा सहभाग घेण्याचे ठरवले. तसेच संमेलनाच्या विचारमंचाला जगदगुरु संत तुकाराम महाराज विचारमंच तसेच संमेलन परिसराला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नाव आणि मुख्य प्रवेशद्वाराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले प्रवेशद्वार असे देण्याचे निश्चित केले. यासाहित्य संमेलनातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व धर्म समभावाची सहिष्णुता आणि अठरा पगड जातींबद्दलचा बंधुभाव आणि आजचे वर्तमान याविषयीचे विचार मांडले जाणार आहेत.
या बैठकीमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष सचिन तिरकर, कार्याध्यक्ष किशोर वाघमारे, उपाध्यक्ष बंडूभाऊ तावरे,सचिव माणिक शिंदे, सहसचिव दिलीप शिंदे, कोषाध्यक्ष प्रतीक वाघमारे, सहकोषाध्यक्ष सदानंद सावंत, सल्लागार उत्तरेश्वर घोडके, अनिस शेख, संजय गायकवाड, नितीन डाके, प्रसिद्धी प्रमुख माधवसिंह राजपूत, राजानंद शिनगारे, सचिन क्षीरसागर, सदस्य संघर्ष तिरकर, निखिल धावारे, सलीम शेख, संदीप सावंत, धनंजय चिलवंत, आदर्श तिरकर, सुजित गायकवाड, धम्मम वाघमारे, स्वप्नील जोगदंड, राहुल फाटक, विकी धिवार, ओम फाटक, अजय जावळे, या बैठकीस प्रा. डॉ. संजय कांबळे, भिकाजी शीलवंत, रमेश बोर्डेकर, के. व्ही. सरवदे, दत्तात्रय गायकवाड, चत्रभुज घाडगे, विशाल वाघमारे, संघरत्न कसबे इत्यादी उपस्थित होते.