धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तथा रॉक ग्रुपच्या वतीने शासकीय विश्रामग्रह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तथा रॉक ग्रुपचे संस्थापक रवि माळाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 मार्च रोजी बैठक घेण्यात आली.

बैठकीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश माने तर सचिवपदी मोसीन तांबोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, भारतरत्न अब्दुल कलाम पुरस्कार विजेत्या पोलीस मुक्ता लोखंडे, रिपाइंचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रोजगार आघाडी नाना शितोळें, माजी नगरसेवक राणा बनसोडे, प्रसेना प्रतिष्ठान तथा रा. कॉ. शहर कार्यांध्यक्ष संदीप बनसोडे, व्हीबीएचे मा. जिल्हा प्रवक्ता विकास बनसोडे, माया कंपनीचे संस्थापक बाळासाहेब बनसोडे, बॉस कंपनीचे संस्थापक मेसा जानराव, रिक्षा युनियन अध्यक्ष जमील तांबोळी, शिक्षक इरफान शेख, बी. आर. प्रतिष्ठानचे संस्थापक रोहित शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 
Top