धाराशिव (प्रतिनिधी)- येथील धनंजय शिंगाडे युवा प्रतिष्ठानच्यावतीने आनंदनगर पोलीस स्टेशन येथे महिला दिनाचे औचित्य साधून शिवचरित्रावरील पुस्तके व पुष्प देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

शनिवारी झालेल्या कार्यक्रमात अनेक महिलांना शिवचरित्रावर आधारित प्रोत्साहन देणाऱ्या पुस्तकांचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आनंदनगर पोलीस निरीक्षक खंडागळे यांचेही देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आनंदनगर पोलीस स्टेशन येथे अहोरात्र नागरिकांना सेवा व संरक्षण पुरवविणाऱ्या पोलीस दलातील माता-भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे  प्रसेनजित शिंगाडे, प्रीतम मुंडे, सम्राट वाघमारे, प्रशांत कांबळे, रोहित शिंगाडे, सुमित भोई, यशवंत शिंगाडे, गौरव धावारे, संजय थोरात, भूषण माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top