धाराशिव (प्रतिनिधी)-यवतमाल जिल्ह्यातील टिपेश्वर अरण्यातून जिल्ह्यात पोहोचलेला वाघ वनविभागाच्या हाती अद्याप लागला नसून, पशुपालकांच्या जनावरांवर त्याचे हल्ले कायम आहेत. बुधवार दि. 12 मार्च रोजी कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एका गोठ्यातील गायीचा फडशा पाडला. तर एक दुभती गाभण गाय गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

मलकापूर येथील शेतकरी संतोष सर्जेराज लोमटे गुरूवारी सकाळी गाईच्या धारा काढण्यासाठी गेले असता गोठ्यातील दोन गायी जखमी अवस्थेत दिसल्या. एक गायीच्या नरड्याचा जावा घेतल्याने ती गाय ठार झाली. तर दुसरी गाय जखमी होती. सदरील घटना गावातील ग्रामस्थांना सांगून वनविभागाला माहिती देवून जखमी गायीवर दहिफळ येथील पशुचिकित्सालयात उपचारासाठी घेवून गेले. 

 
Top