तेर (प्रतिनिधी)- तेरणा मध्यम प्रकल्पा मधून उन्हाळी हंगामा करिता उपविभागीय अभियंता दीपक नाईकनवरे यांचा हस्ते उजवा कालवा मधून सिंचना करिता आवर्तन (पाणी) सोडण्याचा शुभारंभ करण्यात आला.                                           

कालवा प्रवाह 15 क्यूसेक्स राखण्यात आला असून. सदर अवर्तनात एकूण 70.0 हेक्टर क्षेत्रा करिता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे व 1.0दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी मागणी अर्ज भरून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे आवाहन शाखा अधिकारी धनराज वरपे यांनी केले.तेरणा  प्रकल्पामध्ये एकूण 13.30दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. पाणी सोडताना शाखा कार्यालयातील कर्मचारी अभियंता सहायक  धीरज यादव, कालवा निरीक्षक आर.डी. पाटील, सदानंद पडवळ, एस आर काळे, राम माने आदी उपस्थित होते.


 
Top