भूम (ंप्रतिनिधी)- भूम शासकीय विश्रामगृहांमध्ये भूम परंडा वाशी विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख  सुनील काटमोरे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पदाधिकारी यांनी शिवसेना सदस्य नोंदणी वर भर दिला पाहिजे. तसेच काही हेवेदावे असतील तर ते दूर ठेवून कामाला लागावे. तसेच महिला आघाडी व युवा सैनिकांनी देखील या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सदस्य नोंदणीसाठी प्रयत्न केलेला असे ते म्हणाले. 

तसेच यावेळी येथील श्रद्धेचे ठिकाण असलेले आलमप्रभू  देवस्थान या ठिकाणी महाआरती करून श्रीमंतराजे विजयसिंह थोरात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन  राजकीय विषयावर चर्चा केली आहे .तसेच महिला जिल्हा संघटिका जिनत सय्यद न्यूज 18 लोकमत चा मुक्ता पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही शिवसैनिकांच्या वतीने सत्कार केला आहे.

यावेळी  संपर्कप्रमुख  सुनील काटमोरे, उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन  बोराडे शिवसेना तालुकाप्रमुख  अनिल शेंडगे  मेघराज  पाटील, तात्यासाहेब गायकवाड,महिला आघाडी जिल्हा संघटक जीनत सय्यद , विधानासभा प्रमूख प्रल्हाद आडागळे 'महिला आघाडी तालुका संघटिका उमाताई रणदिवे,युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी उमेश जाधव,जिल्हा सरचिटणीस महेश आखाडे, युवासेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे,अनिल गवारे, माजी शहर प्रमुख दीपक मुळे,विहंग कदम, भगवान बांगर,महिला ताई लांडे,रोहिणी गपाट,कोकने मीना ,अजय कोकाटे,दत्तात्रेय खरात,श्रीमंत भडके, विनोद रेडे, उमेश परदेशी यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील विभाग प्रमुख उपतालुकाप्रमुख व इतर प्रमुख पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top