तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात हेरिटेज क्लब अंतर्गत दोन दिवशीय मूर्तीकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
या आयोजनासाठी सोलापूर येथील शिल्पकलाकार सचिन जाधव आले होते. यामध्ये सहावी ते आठवीतील ११६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य श्री के वाय इंगळे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावरती श्री एच जी जाधव,डी एस देशमुख, बसवराज कोरकर होते.
या कार्यशाळेत प्रथम सचिन जाधव यांनी मातीचे वेगवेगळे प्रकार , माती पासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात .या वस्तू टिकवून ठेवण्यासाठी त्याची बनावट कशा पद्धतीने केली जाते .हे सांगून या मूर्तीच्या द्वारे आपली भारतीय परंपरा, चालीरीती, पुरातन जीवनशैली , वारसा कशा पद्धतीने जतन व त्याचे संवर्धन केले जाते .या संदर्भात सर्वप्रथम त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर या माती पासून वेगळे प्रकारच्या मुर्त्या, दिवे, पणत्या ,अलंकार करून विद्यार्थ्यांना दाखविले व काही विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार, दिवे ,पणत्या, मडके, वेगवेगळे मुखवटे प्रत्यक्ष बनवून घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगी मूर्ती कलेद्वारे सृजनशीलता विकसित होते हे सांगून शब्दापेक्षा मूर्तीतून भाव कसे जास्त स्पष्ट होतात. हे अनेक मूर्तींचे चेहरे बनवून दाखवून दिले . शेवटी त्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या अलंकाराचे व मूर्तींचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन हेरिटेज क्लबचे प्रभारी विद्यालयातील कला अध्यापक श्री बसवराज कोरकर यांनी केले होते .या कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री हरी जाधव यांनी केले