धाराशिव (प्रतिनिधी)- महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्व घटकांना न्याय देणारा आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, वाहतूक अशा सर्व घटकांना सामावून घेत विकासाच्या दृष्टीने एक नवे पाऊल उचलले आहे. गुंतवणूकदाराना आकर्षित करून महाराष्ट्रातील 50 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची नांदी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'विकसित भारत' च्या धर्तीवर 'विकसित महाराष्ट्र' ही संकल्पना महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर आणणारी आहे. मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोदावरी खोऱ्याचे पुनर्भरण आणि सर्वात महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाच्या सहायातून पूर्णत्वास आणण्याचा निर्णय शेती आणि उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

 
Top