परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील धाराशिव येथे वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने राज्यव्यापी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची हाक देण्यात आली होती. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार सन 1949 चा व्यवस्थापन कायदा रद्द करून महाबोधी महाविद्यालयाचे व्यवस्थापन बोद्धांच्या हाती द्यावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे देण्यात यावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून बौद्ध भिकू व बौद्ध समाजा बांधवांकडून बुद्धगया येथे आंदोलन सुरू केले आहे. 

देशभरातील मंदिर,मस्जिद,गुरुद्वारे,चर्चे यांचे व्यवस्थापन व देखभाल त्या त्या धर्माकडे आहे. परंतु महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झालेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन मात्र अन्न धर्मीयांकडे आहे. त्यामुळे सन 1949 चा व्यवस्थापन कायदा रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचा ताबा बोध्दांकडे देण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीद्वारे येऊन निदर्शने करण्यात आली. प्रथम याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शांततेमध्ये रॅली सुरुवात करण्यात आली. छ.शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या रॅली द्वारे शांततेमध्ये येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्यामार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान,बिहारचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रभारी ॲड.रमेश गायकवाड,युवक आघाडी निरीक्षक अमोल लांडगे,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,बाबासाहेब जानराव,वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे,भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे,भारतीय बौद्ध महासभा उत्तर जिल्हाध्यक्ष हनुमंत प्रतापे,जिल्हा सरचिटणीस दिलीप निकाळजे,शितल चव्हाण,शिला चंदनशीवे,सुधीर वाघमारे अजिंक्य गायकवाड,आर एस गायकवाड,विकास बनसोडे,कुंदन वाघमारे,नामदेव वाघमारे,नासिर शेख,अरुण गरड,शिवाजी कांबळे,भाऊसाहेब आंदुरकर रामभाऊ गायकवाड,राहुल पोरे,विद्यानंद वाघमारे,मुकुंद लगाडे,गोविंद भंडारे,बाबा वाघमारे,मिलिंद खुणे,गणेश चंदनशिवे, अनिल हजारे यांच्या सह वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा कार्यकर्ते पदाधिकारी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top