धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये इ. ५ वी ते ८वी विभागात चित्रकला , रांगोळी , प्रश्नमंजुषा , आकृती रेखाटन अश्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन सी.व्ही. रमन राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , विज्ञान विभागप्रमुख संतोष देशमुख पर्यवेक्षक राजेंद्र जाधव , सुनिल कोरडे , धनंजय देशमुख , निखिल गोरे यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या दिनी इ. ८वीची विद्यार्थीनी विराक्षी मगर हिने विज्ञान लावणी नृत्य सादर केले व पर्यवेक्षक राजेंद्र जाधव यांनी विज्ञान दिन सी.व्ही. रमन का साजरा केला जातो या बाबत प्रास्ताविक केले.त्याच बरोबर मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षणा अंतर्गत अध्यपनासाठी सहा माहिने नेमणुकीच्या इ इ.५वी श्रीमती अर्चना काळे, इ. ७वी श्रीमती रेखा भोसले व आदि अध्यापन गण यांचा उत्तम कार्याबद्दल प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी सौ.पी.डी.परतापुरे, विज्ञान शिक्षक केशव पाटील , शिक्षिका सौ.लोकरे, संजय वाघमारे,हनंमत ठेले, विठ्ठल लोमटे, नरसिंग साळुंके, सौ. संगिता साळवी, शरद क्षिरसागर, सौ. अर्चना देशमुख , सौ. व्ही.एन. तुळजापूरे आदि विज्ञान अध्यापकगण यांनी परिश्रम घेतले. छायाचित्रण कलाध्यापक शिवाजी भोसले, शेषनाथ वाघ , सुरज सपाटे यांनी केले सुत्रसंचलन संदीप जगताप व दिपक केंगार यांनी केले आभार वैभव चौधरी , यांनी मानले . विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत उत्साहात सहभाग नोंदवून दिन महत्व जाणून घेऊन भविष्याचे वैज्ञानिक बनण्याचा निर्धार केला.