कळंब (प्रतिनिधी)- सादर केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या आर्थसंकल्पात आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष केले असून आरोग्य खात्याच्या तोंडाला पाणे पुसली गेली आहेत. अशी प्रतिक्रिया आयएमए चे माजी प्रदेशाध्यक्ष  डॉ रामकृष्ण लोंढे यांनी दिली आहे.

शासनाकडे बजेटच्या 8% निधी आरोग्य विभागाच्या विविध योजना वर खर्च करणे संदर्भात वेळोवेळी मागणी करण्यात आली होती व तशी तरतूद करणे आवश्यक असताना देखील मागणी च्या निम्मा म्हणजे 4% देखील प्रस्तावित केल्याचे दिसून येत नाही. 

केवळ दळणवळण आणि उद्योग क्षेत्रासाठी भरपूर निधी दिल्याचे दिसून येते परंतु या सर्व गोष्टी आमलात आणण्यासाठी व कुशलतेने पुढे नेण्यासाठी माणसाचे आरोग्य सक्षम असणे तेवढेच आवश्यक आहे हे विसरून चालणार नाही. महिला मधील वाढत्या सरव्हाकल कॅन्सर चे प्रमाण रोखण्यासाठी एच पी व्ही लसीकरण करणे खूप आवश्यक आहे. तसा इंडियन मेडिकल असोसिएशन, बाल आरोग्य परिषद व स्री आरोग्य परिषद ई वैधकीय संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला असून देखील त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते. तसेच मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी प्राथमिक शाळांचे बळकटीकरण करण्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे हे पण विसरून चालणार नाही. एकंदरीत आज सादर केलेल्या राज्याच्या आर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पाणे पुसली गेली आहेत हेच खरे.

 
Top