धाराशिव (प्रतिनिधी)-  शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कॉलेज,कळंब येथे निपुन महाराष्ट्र अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य कृती कार्यक्रमावर आधारित कार्यशाळेचे आयोजन दि. 26 मार्च रोजी करण्यात आले. ही कार्यशाळा सकाळी 8.30 ते दुपारी 1 या वेळेत संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे, शिक्षणाधिकारी अशोक पाटील, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते व शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यशाळेच्या प्रारंभी गट शिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले. 5 मार्च 2025 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा व शंका निरसन करण्यात आले. तसेच तालुक्यातील इयत्ता 2 री ते 5 वीच्या 100 टक्के क्षमता प्राप्त वर्ग शिक्षकांनी आपले अनुभव कथन केले. शिक्षक हनुमंत घाडगे व उत्तरेश्वर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तर श्रीकांत तांबारे, भोरे, कासले व पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आभार सोमनाथ चंदनशिव यांनी मानले.

 
Top