धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कारागीर - क विजतंत्री म्हणून सेवानिवृत्त झालेल्या जनार्दन माने यांचा रा.प. महामंडळाचे उपयंत्र अभियंता मिथुन राठोड यांच्या हस्ते जनार्दन व रेखा यांचा सपत्नीक दि.29 मार्च रोजी सत्कार करण्यात आला.

जनार्दन माने हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कारागीर - क विजतंत्री म्हणून 36 वर्षे चोख सेवा बजावली आहे. यावेळी रा.प. महामंडळाचे उपयंत्र अभियंता राठोड यांच्यासह अविनाश मांजरे, सतीश नाईकवाडी, ज्योतीराम संकपाळ, रणजीत पवार, गणेश जानगवळी आदींसह कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी मानले.


 
Top