परंडा (प्रतिनिधी) - येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे महाराष्ट्र प्रतिनिधी डॉ.शहाजी चंदनशिवे यांची नुकतीच जय मल्हार कामगार संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष दाजीराव मारकड यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली आहे. यावेळी  वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, आर पी आय चे राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, संस्थापक अध्यक्ष बाजीराव मारकड, मराठवाडा अध्यक्ष बालाजी शिंगे, वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून परंडा येथिल कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आलिशान शेख, वंचित बहूजन आघाडीचे सह सचिव मोहनबनसोडे, तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे ,भूम परंडा वाशी प्रमुख मोहम्मद शेख ,यूवा अध्यक्ष फिरोज तांबोळी यांच्या सह जिल्ह्यातील अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. शहाजी चंदनशिवे  यांचे महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संशोधन सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असल्याने त्यांना या कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे मत कामगार संघटनेचे अध्यक्ष दाजीराव मारकड यांनी व्यक्त केले.

 यावेळी प्रवीण दादा रनबागुल संजयकुमार बनसोडे धनंजय सोनटके फिरोज तांबोळी यांनी आपले मनोगते व्यक्त केली डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या निवडीमुळे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार नीलेश काकडे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सचिव शिवमती आशाताई मोरजकार, श्री भवानी शिक्षण प्रासारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, गुरुवर्य प्राचार्य डॉ.अशोक मोहेक, स्वाभीमानी मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ.शंकर दादा अंभोरे यांनी व रा.गे.शिंदे महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, तसेच जिल्ह्यातील अनेक मित्र परिवार यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.


 
Top