धाराशिव (प्रतिनिधी)- पर्यावरण नष्ट केले तर सर्वसामान्यांचे प्रश्न वाढतील. कारण सर्वसामान्यांचा चरितार्थ निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे शाश्वत विकास करीत असताना निसर्गाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. असे मत पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात जल व भूमी व्यवस्थापन विभागाच्या वतीने अन्न सुरक्षिततेसाठी शाश्वत जल व्यवस्थापन “ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष, नानासाहेब पाटील, अधिसभा सदस्य तथा धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, देविदास पाठक, विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित, परिषदेचे निमंत्रक तथा जल व भूमी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पाटील आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, दरवर्षी पाच लाख हेक्टर जंगल नष्ट होत आहे. भुस्खलन दरवर्षी होत आहे. जल, जंगल, जमीन कशी आहे, हे समजून घेतले पाहिजे. झाडामुळे आपत्ती तसे मातीची घूप रोखली जाते. मातीच्या प्रकृतीवर देशाची प्रकृती अवलंबून आहे. 150 कोटी टन माती समुद्रात वाहून जाते. नद्यामध्ये माती वाहून जात आहे. मातीची धूप रोखली पाहिजे. असे सांगितले. प्रत्येक व्यक्तीला प्रति वर्षी 13.50 लाख लिटर पाणी उपलब्ध होत असेल, तर त्या देशाला जल संपन्न म्हणता येईल.सेंद्रिय शेतीच्या माध्यमातुन दर्जेदार व विष मुक्त अन्न मिळेल. असे प्रतिपादन जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील यांनी केले. भारतातील सर्वसामान्य माणसांचा बुध्दयांक व भावनांक जगात सर्वात जास्त आहे. देशात असणारी आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट झाली पाहिजे असे मत विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केले. डॉ. विक्रम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित पडवळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.