परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.महेशकुमार माने व वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ. संतोष काळे यांना भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद  (ICSSR) यांच्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांच्या विद्युत ऊर्जेचा वापराचा अभ्यास करून सौर ऊर्जा वापरा संदर्भात संशोधन करण्यासाठी सदर प्रकल्प मंजूर झाला आहे. यासाठी कर्नाटक राज्यातून संध्या एम डॉ.पद्मावती शिनोय डॉ आश्र्विता कारेरा व सेल्को सोलार लाईट प्रायव्हेट लिमिटेड बेंगलुरु यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.आठ लक्ष रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आहेत .सदर प्रकल्प हा एक वर्षासाठी असणार आहे. महाविद्यालयात प्रथमच संशोधन करण्यासाठी या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. प्रकल्प मंजूर झाल्यामुळे व पुढील संशोधन करण्यासाठी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी अभिनंदन व कौतुक केले.

    डॉ महेशकुमार माने व डॉ संतोष काळे यांचा हा प्रकल्प मंजुर झाल्यामुळे  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .याप्रसंगी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे संशोधन समितीचे समन्वयक डॉ.अतुल हुंबे व कला वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.


 
Top