धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी न केल्यास शिधा वितरण बंद होण्याची शक्यता आहे.याआधी अंतिम मुदत २८ फेब्रुवारी होती.मात्र,नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ३० मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना रेशन दुकानातील ई-पॉस मशिनवर अंगठा स्कॅन करावा लागत होता. मात्र,सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी आणि अनेक शिधापत्रिकाधारक बाहेरगावी असल्याने अडचणी येत होत्या.या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने "Mera e-KYC Mobile App" आणि "Aadhar Face RD Service App" हे मोबाईल अॅप्स सुरू केले आहे.

ई-केवायसी करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.Google Play Store वरून "Mera e-KYC Mobile App" आणि "Aadhar Face RD Service App" डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे. Mera e-KYC Mobile App उघडून राज्य आणि ठिकाण निवडावे.आधार क्रमांक टाकून आलेला OTP संबंधित रकान्यात भरावा.सर्व माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करावे.Face e-KYC पर्यायावर क्लिक करून सेल्फी कॅमेरा सुरू करावा.डोळ्यांची उघडझाप करून फोटो काढावा.प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर "e-KYC पूर्ण" झाल्याचा संदेश मिळेल.जिल्हा प्रशासनाने सर्व रेशनकार्डधारकांनी ३० मार्चपूर्वी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरी बसूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी कळविले आहे.

 
Top