धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर शहराच्या बाहेरील भागात बार्शी रोड येथे सत्तार यासीन इनामदार रा. सिंदफळ यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडच्या सहाय्याने डोक्यात जखम करून खून केला होता. या संदर्भात स्थानिक गुन्हा शाखेने त्वरीत तपासाचे चक्रे फिरवून 24 तासात गुन्हेगारांना अटक केली आहे.

सदरील गुन्ह्यातील मुख्य संशयित समाधान संपत शिंदे, रा. धारुर हा कोल्हापुर जिल्ह्यातील कागल येथे गेला असल्याबाबत विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. तसेच त्यानेच हा खून केला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तात्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पाठविण्यात आली. सदरील आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच याच गुन्ह्यातील आणखीन एक आरोपी गणेश घाटशिळे रा. सिंदफळ यास तुळजापूर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या आणखी एका टीमने ताब्यात घेतले. अशा प्रकारे अत्यंत संवेदनशील अशा खुनाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तत्परता दाखवीत अवघ्या 24 तासांमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक  गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर  निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, सपोफौ वली उल्ला काझी पोलीस हवालदार विनोद जानराव, शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, दयानंद गादेकर पोलीस नाईक नितीन जाधवर बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी, अशोक कदम, सुनील मोरे, चालक मेहबूब अरब, रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.

 
Top