भूम (प्रतिनिधी)- जातीभेदाच्या भिंती तोडून सामाजिक सलोखा राखणे काळाची गरज आहेफ असे मत चोकोबा ते तुकोबा एक वारी समतेची आयोजित समता वारी चित्रमय अहवाल पूस्तीका व संत सोयराबाई व्यक्तित्व अन् कर्तृत्व या दोन पूस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी व्यक्त केले.
गुरुवार दि. 6 मार्च 2025 रोजी श्री क्षेत्र आलमपूभू देवस्थान येथे चोखोबा ते तुकोबा एक वारी संमतेची आयोजित समता वारी चित्रमय अहवाल पुस्तक व संत सोयराबाई व्यक्तित्व व कर्तृत्व पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, वारीचे मुख्य प्रवर्तक मार्गदर्शक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रकाशन सोहळ्याचे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून हभप. अरुण काळे महाराज होते. तर संत चोखामेळा अध्यासन केंद्र संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील, संयोजन समिती अध्यक्ष प्रा. सौ.अलका सपकाळ, हपभ. अरुण काळे महाराज, हपभ. सोमनाथ बाबर महाराज, माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष हेमंत देशमुख, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, ता.सरचिटणीस संतोष सुपेकर, अ.जा.मोर्चा ता.अध्यक्ष प्रदीप साठे, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष योगेश आसलकर महाराज, व्यापारी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवळी, आकाश शेटे, सिद्धार्थ जाधव, लक्ष्मण भोरे, अमित पाटील, संदीप महानवर, कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, जिल्हा परिषद शाळा भूमचे मुख्याध्यापक तात्या कांबळे आदि उपस्थित होते. याशिवाय आलम प्रभू देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दिलीप शाळा महाराज, ट्रस्टी बाळासाहेब हूरकुडे, दीक्षित, रवींद्र टेकाळे यांचेसह भाविक भक्तांचीही उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शंकर खामकर यांनी मानले.