कळंब (प्रतिनिधी)- धाराशीव व कळंब शहरातील विविध कामांसाठी निधीची गरज होती. यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. यानुसार नगर विकास विभागाने धाराशीव शहरातील विकासासाठी 4 तर कळंब शहरातील विकासकामासाठी 6 असा एकूण 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती अजीत पिंगळे यांनी दिली आहे.
धाराशीव कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी भरीव निधीची गरज होती. यासाठी मागच्या तीन महिन्यापासून शिवसेनेचे नेते अजीत पिंगळे यांचा नगर विकास मंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.
अखेर अजीत पिंगळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांस यश प्राप्त झाले असून 20 मार्च रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने धाराशीव शहरातील विकास कामासाठी 4 कोटी तर कळंब शहरातील विकासकामासाठी 6 कोटी रूपये अशा 10 कोटींच्या कामांना राज्यातील नगर परिषदांना 'वैशिष्टय़पूर्ण' कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते त्या धर्तीवर 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती अजीत पिंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
धाराशीव, कळंब या दोन्ही शहरातील विकासकामासाठी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक, खा. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजयजी मोरे ,माजी राज्यमंत्री तथा तुळजापूरचे आ. राणा जगजितसिंह पाटील, माजी खा. रविंद्र गायकवाड, शिवसेना उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. यापुढे पण सरकारच्या माध्यामातून धाराशीव, कळंब विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न व विकासकामांसाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे अजीत पिंगळे यांनी सांगितले. धाराशीव शहरात रस्त्याचे विविध 40 कामे व त्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कळंब शहरातील देवालयाचा मंदिर खुलणार
शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर सभागृहासाठी 50 लक्ष, सावरगाव येथील हनुमानमंदिर परिसर नप जागेत लादीकरण 70 लक्ष व सावरगाव उद्यानात व्यायाम साहित्य व खेळणी बसवणे 60 लक्ष, नेहरू उद्यान विकासासाठी 30 लक्ष, कल्पना नगर स. न. 111 खुल्या जागेत लादीकरण 30 लक्ष, पुनर्वसन कळंब महादेव मंदिर परिसर लादीकरण 50 लक्ष, अंबाबाई मंदिर परिसर लादीकरण 50 लक्ष, खंडोबा मंदिर परिसरात लादीकरण 25 लक्ष, सावरकर पुतळा परिसर लादीकरण 25 लक्ष, वकिल सोसायटी संरक्षक भिंत 25 लक्ष, महसूल कॉलनी दत्त मंदिर व संत भगवान बाबा मंदिरासमोर सुधारणा व कमान बांधकाम 25 लक्ष, संत रोहिदास महाराज मंदिर परिसर लादीकरण 40 लक्ष, क्रिडा संकुल लादीकरण 50 लक्ष, सर्व मंदिर परिसरात विद्युत पोल उभा करणे 20 लक्ष तर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चबुतरा सुशोभीकरण करण्यासाठी 50 लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती अजीत पिंगळे यांनी दिली आहे.