धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शिवशंभूपंढरी वसाहतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 वी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रथम दहीदूधाने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस तथा माजी नगरसेविका  सौ. प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर शिवरायाचा पाळणा गाऊन आरतीने जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी हभप प्रा. श्यामराव दहिटणकर , सौ. प्रगती संभाजी बागल, भोसले हायस्कूलचे कलाध्यापक शेषनाथ वाघ, सौ. सुनिता दहिटणकर, सौ. सुदर्शना वाघ, युगा, मैथिली, श्रिया दहिटणकर, उषा गादेकर, विशाखा, राजमुद्रा बागल,प्रणव, प्रतिक गादेकर, उपस्थित होते.


 
Top