तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचीकुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या  मंदीरातील गर्भगृहातील  सिंहासनावर शिवजयंती दिनी बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी  भवानी तलवार अलंकार महापुजा मांडण्यात आली होती. भवानी तलवार अलंकार महापुजा पाहण्यासाठी भाविकांनी  मंदीरात एकच गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बुधवार दि. 19 फेब्रुवारी क्रोधी नाम संवत्सरे शके 1946 माघ कृष्ण 6 (षष्ठी) रोजी देविजींच्या सिंहासनावर 'भवानी तलवार अलंकार“महापूजा मांडण्यात आली होती. ही अलंकार महापुजा वर्षातुन शारदीय नवराञ, शाकंभरी नवराञ, शिवजयंती या तीन दिवस मांडली जाते. ही पुजा मांडण्या बाबतीत अशी आख्यायिका सांगितली जाते कि, स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली. त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह तालुक्यात गावोगाव, घरोघर, घरावर भगवा ध्वज फडकावुन घरासमोर रांगोळी काढुन छञपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन करुन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छञपती शिवाजी चौकातील छञपती शिवाजी महाराज अश्वरुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सर्वजाती धर्माचा शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

 
Top