धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्लीतील धाराशिवचा महाराजा  श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या रंगमंचकासमोर गणेश जयंती अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. भक्तांच्या गर्दीने गणपतीच्या समोरील  मैदान खचाखच भरले होते. गणेश जयंतीच्या निमित्ताने मंडळ गेली 61 वर्षापासून धाराशिवकारांची सेवा करीत आहे . मंडळाने  या वर्षी संविधान  अमृत महोत्सव, संविधान उद्देशिका वाचन करून  संविधान घोषवाक्य  सामूहिक घोषणा ""संविधानाने दिला मान =स्त्री-पुरुष एकसमान"."   आदी घोषणाने   केली .प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी काशिनाथ दिवटे व प्राध्यापक गजानन गवळी यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले दुपारी तीन वाजता वाजता महिला मंडळाच्या वतीने शेकापूर येथील संत माऊली महिला भजनी मंडळ  यांचे सौ.सविता दंडनाईक गटाने भजन गीत सादर केली 

सायंकाळी अथर्वशीर्ष पठाण  व फलश्रुती अकरा वेळेस म्हणून , गीता पठण सामुदायिक रित्या म्हणून अत्यंत  धार्मिक व प्रफुलित वातावरणामध्ये संपन्न झाली.  गणपतीचा जन्म पाळण्यामध्ये नाव ठेवणे व महिलांनी नाव ठेवण्याच्या वेळी विविध पाळण्याचे गाणे सादर केले  बालाजी पेचफुले व ओंकार ओमासे यांचा नवस व संकल्प पूर्ण झाल्याबद्दल 32 किलो वजनाचा पितळेचा 2फूट उंचीचा मूषक उंदीर श्री चरणी अर्पण करून अरुण रेवंडकर पुरोहित यानी प्रतिष्ठापनेचा व विधीचा मान श्री व सौ  गिरीश  पाळणे दांपत्यांना मिळाला. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील यशवंत गुणवंत

गौरव बागल,  योगेश अतकरे, संदिप इंगळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उस्मानाबाद शहरांमध्ये शिवराज्याभिषेक समिती,मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समितीवर युगप्रवर्तक समिती निवड यांचा  सन्मान,  उत्कृष्ट दंतरोग तज्ञ विशाल सारडा,  सौ. सविता दंडनाईक, सौ.एडके मु.अ.कन्या प्रशाला  व वलगुड येथील मुलीनां शैक्षणिक साहित्य वाटप,  अमृत महोत्सव जेष्ठ महिलांचा सन्मान मंडळाच्या वतीने श्रीफळ, मंडळाच्या श्री ची प्रतिमा, सन्मानपत्र  , शेला देऊन यांचा सन्मान करण्यातआला.

बागल,इंगळे त्याने आपले मनोगत व्यक्त केले हा संपूर्ण सत्कार प्रा. गजानन गवळी ,काशिनाथ दिवटे, युवराज हुच्चे, विश्वास  दळवी,दुर्गेश दिवटे , वरुण  साळुंके, श्रीकांत दिवटे ,विद्यानंद साखरे ,अतुल ढोकर वैभव अंजीखाने ,जावळे, सच्चिदानंद पोतदार, संजय पाळणे ,केदार उपाध्ये,  मनोज अंजीखाने,बसवेश्वर पाळणे ,सुनील देवळे,  ऋषिकेश चवडके ,रंजीत  बुरुंग ,आकाश महामुनी, इत्यादीने परिश्रम घेतले व सत्कार यासंबंधीच्या हस्ते करण्यात आला .महिला मंडळाच्या वतीने अलका गवळी ,उज्वला दिवटे, निर्मला गवळी  , गौरी कुलकर्णी , अनुराधा पाळणे, कल्याणी उपाध्ये  सरस्वती अंजीखाने  उषा चवंडके ,नम्रता हुच्चे, ज्योती गवळी, सुरेखा, पुष्पा हुच्चे, पाळणे, गवळी व लहान मोठ्या सर्व महिला मंडळांनी हा कार्यक्रम तीन तासाचा यशस्वी करण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे मंत्र उपचार, पूजा विधि, शास्त्रोक्त पद्धतीने, सुसंस्कारी पद्धतीने पार पाडण्यासाठी पुरोहित  श्री शामकुमार दहिटणकर व बंडोपंत जोशी , सचिन स्वामी, काशिनाथ दिवटे यांनी आपल्या आवाजाने भावमय वातावरण झाले. फटाक्यांच्या व शोभेच्या दारूच्या आतषबाजीने गणेश जयंतीच्या जयघोशात  महाप्रसादाचा आस्वाद घेतला  कार्यक्रमाचे संचलन प्रा.भालचंद्र हुच्चे व आभार राजकुमार दिवटे यांनी  मानले.


 
Top