धाराशिव (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात शासनाच्या नियमानुसार सर्व सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतात.तसेच विविध सेवा देखील देण्यात येत असल्याचे अधीक्षक यांनी कळविले आहे.
वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या मेनूप्रमाणे भोजन दिले जाते.खेळाचे साहित्य आणि शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून दिले जात. वसतीगृहात सुरक्षा रक्षक तैनात असून,गेटवर ये-जा नोंदवहीमध्ये प्रत्येक हालचालींची नोंद केली जाते. तसेच,वसतीगृहाची इमारत आणि मूलभूत सुविधा वेळोवेळी दुरुस्त करून विद्यार्थ्यांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेतली जात असल्याची माहिती नळदुर्ग येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे अधीक्षक यांनी दिली.