परंडा (प्रतिनिधी) - महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना. प्रा.रामभाऊ शिंदे यांनी परंडा येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या 'संवाद' निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता त्यांचे परंडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपले जेष्ठ सहकारी असलेले माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा विशेष सत्कार केला.
तसेच विधानपरिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे यांनी स्वतः भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवस दि.21 फेब्रुवारी रोजी झाला होता या निमित्ताने त्यांनी फेटा बांधून ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीरभाई चौधरी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस विठ्ठल तिपाले, सुजित परदेशी, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, भाजपा परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा तालका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद बप्पा रगडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, सारंग घोगरे, जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीमंत शेळके, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, हनुमंत पाटील, निशीकांत क्षिरसागर, रमेशनाना पवार, भागवत खोत, श्रीराम देवकर, संकेत ठाकूर, धनंजय काळे, मनोज पवार, आदर्श ठाकूर, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, आकाश मदने, गौरव पाटील, मनोहर पवार, राज वळसंगकर, सिद्धीक हन्नुरे, सुरज काळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा नुतनताई खोसरे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा ज्योतीताई भातलवंडे, शुभदाताई शेलार, विठोबा मदने तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.