परंडा (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तु.दा.गंगावणे यांनी दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत कवी संमेलनामध्ये सहभाग नोंदवून प्रकाशमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट कविता सादर केली व दिनांक 21,22 आणि 23 फेब्रुवारी 2025 या तीन दिवसाच्या दिल्ली येथे आयोजित केलेल्या संमेलनामध्ये सहभाग नोंदवला. त्यांच्या या यशस्वीतीमुळे गुरुवार दि27 रोजी फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या हस्ते पुष्पगुच्छ हार घालून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे, प्रा.विलास गायकवाड, तालुका शहराध्यक्ष किरण दादा बनसोडे, तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे युवा अध्यक्ष रणवीर निकाळजे, जनरल कामगार संघटनेचे भूम परांडा वाशी तालुक्याचे प्रमुख मोहम्मद शेख तसेच सूर्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज शिंदे, प्रमोद बोराडे ,सोमा चौतमहाल, रमजान शेख आदी उपस्थित होते. गंगावणे यांनी यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजी नगर पुणे आणि दिल्ली येथे प्रतिनिधित्व केलेले आहे.व त्यानंतर आता दिल्ली येथील 98 साहित्य संमेलनात देखील त्यांनी आपला सहभाग नोंदविला असून पुणे येथे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे.त्यांच्यासोबत नारायण सुर्वे, प्रकाश देवळे,जगदीश खेबुडकर, रामदास फुटाणे आणि प्रमोद शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये आपला साहित्याचा ठसा आणि नावलौकिक उमटल्याने धाराशिव जिल्ह्यातील पंचक्रोशीत नव्हे तर मराठवाड्यात महाराष्ट्रात त्यांची एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून सर्व परिचित आहेत.  महाराष्ट्र साहित्य कोश मध्ये त्यांची नोंद आहे.अशा प्रमुख भूमिकेमधून गंगावणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top