धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य व त्यागावर आधारित ‌‘छावा' चित्रपटाचे मोफत शोचे आयोजन आज ताजमहाल टॉकीज, धाराशिव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तडवळा येथील बालकाश्रम, स्वाधार मतिमंद मुलांची शाळा खेड , आश्रम शाळा ,बावी येथील सुमारे 300 अनाथ मुलांसाठी आयोजित करण्यात आले.

या प्रसंगी आमदार कैलास दादा पाटील, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अनाथाश्रमातील मुलांसोबत बसून हा चित्रपट पाहण्याचा अनुभव सर्वांसाठीच भावनिक व प्रेरणादायी ठरला.

चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठी दिलेले बलिदान, त्यांचे अपार धैर्य आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या चित्रपटामुळे मुलांना आपल्या खऱ्या सुपरहिरोची ओळख पटली, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. “महाराज होतात म्हणूनच आपण आहोत” ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये कायम राहावी, यासाठी असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील, असे आयोजकांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्याबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

या प्रसंगी आतीशभैय्या पाटील, सोमनाथ आप्पा गुरव, आण्णा तनमोर, दिपक जाधव, प्रविण कोकाटे, नितीन बप्पा शेरखाने, राजाभाऊ पवार, पंकज पाटील, तुषार निंबाळकर, रवी वाघमारे, गणेश असलेकर, सुरेश गवळी, सुनिल वाघ, हनुमंत देवकते, गणेश साळुंके, कलीम कुरेशी, सतीश लोंढे, मनोज पडवळ,राज निकम, शहाजी पवार, विनोद केजकर, नाना घाडगे  केदार हिबारे आदीसह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थीत होते.


 
Top